Friday, 11 March 2016

माझ्याबद्दल



हरि ओम,
मी सुचितावीरा कोंडस्कर....माझ्याबद्दल थोडस......
माझ बालपन हे सर्वसामान्यांप्रमाणेच होत. लहानपणीच वडिलांचे छत्र
हरवल्यामुळे आईचाच आदर्श घेऊन वाढत गेले. आईने माझ्या सगळ्या कलागुणांना
वाव तसेच उचित दिशा दिली. जीवनाच्या वाटेवर भरकटू नये म्हणून उचित मार्ग
दाखविणार मारागादर्शक लागतो आईने तोदेखील सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या
रूपाने दिला आणि जीवनाला उचित दिशा मिळाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे माझा जन्म झाला. लहानाची मोठी तिथेच
झाले. कुडाळ हायस्कूल मध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षण सुरु
असताना कधी नाट्यकलेची आवड निर्माण झाली कळलेच नाही. आवड निर्माण झल्यावर
ती जोपासण्यासाठी घरून प्रतिसाद मिळणं गरजेचा असत तो मी एक मुलगी असूनही
मला मिळाला. अगदी नाटकांच्या सरावापासून ते नाटकांच्या प्रयोगापर्यंत
जिथे जिथे सोबत, सहकार्य लागले ते सर्व मिळत गेले.

आज मी नोकरी निमित्त मुंबई येथे आहे. सहज एकदा बापूंच्या प्रवचनामध्ये
आले तुम्ही कधी स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयास केले आहेत का
? मला उत्तर सापडेना. कारण आवड तर मला नाटक, नाच, रांगोळी, चित्रकला ह्या
सगळ्यांची आहे. कॉलेज पर्यंत ह्या सगळ्यावर खूप मेहनत घेतली. अगदी सगळ्या
स्पर्धानमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक देखील मिळविला. त्यानंतर कधीतरी
नाटकात काम करणे, सणावाराला रांगोळी काढणे असे चालू होते. सध्या ह्या
धकाधकीच्या जीवनात माझ्या कलागुणांना पुरेसा वाव देणे शक्य होत नाही.
परंतु छंद
म्हणून कधी नाटक किंवा सिनेमा पहिला तर माझ्यातला कलावंत जागृत
झाल्यावाचून राहत नाही. मग त्याविषयी भरभरून बोलावेसे वाटते त्यासाठी काय
करावे हा विचार करीत असताना स्वतःच्या ब्लाग च्या माध्यमातून आपली हि
इच्छा आपण पूर्ण करू शकतो व सर्वांशी संवाद साधू शकतो. म्हणून हा छोटासा
प्रयत्न करीत आहे. एक कलावंत म्हणून तुम्हा रसिक प्रेक्षकान कडून
टाळ्यांच्या ऐवजी comments च्या प्रतिसादाची अपेक्षा करते.

मी अम्बज्ञ आहे.